Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू, देशभरात सात टप्प्यात मतदान


नवी दिल्ली, दि. १० : देशात १७ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून २३ मे २०१९ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ या तारखांना पहिल्या चार टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेपासूनच देशात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

देशात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 20 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 91 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 18 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 25 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 26 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 28 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 97 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 19 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 26 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 27 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 29 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात 14 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 115 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 8 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 9 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 71 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 2 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. देशात 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 51 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 10 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 12 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 59 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 16 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 19 मे रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 59 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 22 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

आचारसंहिता काळात असे असणार नियम -
निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरणपूरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

संवेदनशील मतदारसंघांवर व्हिडीओग्राफी, सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांमधून आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे.

सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता -
निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युट्यूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom