मतदारांशी थेट संवादासाठी दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचा पदयात्रांवर भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2019

मतदारांशी थेट संवादासाठी दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचा पदयात्रांवर भर


मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असतानाच आता दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मतदारांशी थेट संपर्कावर भर देण्याचे नियोजन केले आहे. रविवारचा संपुर्ण दिवस त्यांनी मतदारसंघातील विविध भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात घालवला. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासाच्या नावाखाली केलेला बट्ट्याबोळ मतदारांपर्यंत पोहचवतानाच काँग्रेसच्या जाहिरनाम्यात दिलेली वचने आणि त्याच्या अंमलबजावणीचा आराखडा याबाबतची संक्षिप्त माहिती या पदयात्रांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे.

सरकारी पक्ष खोट्या प्रचाराच्या माध्यमातून न झालेल्या विकासाचे दावे करत आहेत. या दाव्यांमधील फोलपणा मतदारांना दाखवून त्यामागील तथ्य सांगण्याचा प्रयत्न या थेट संपर्क अभियानाद्वारे करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी एकनाथराव गायकवाड यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सायन चर्चला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर सकाळी दहा वाजता धारावी परिसरातील नाईक नगर येथे पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. अकराच्या सुमारास चेंबूर कॅम्प परिसरातील रामटेकडी गार्डन येथे अल्पसंख्यक समाजासोबत संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारनंतरच्या दुसऱ्या सत्रातही अॅन्टॉप हिल परिसरातील विजय नगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या आसपासच्या परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी वडाळा येथील सॉल्ट पॅन रोड परिसरातील शिवशंकर नगरातील साई भंडाऱ्यालाही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

Post Bottom Ad