मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ राज्य आणि देशपातळीवरील दिग्गज नेत्यांच्या होणार सभा


मुंबई - ईशान्य मुंबईत भाजप-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीचा प्रचार धडाक्यात सुरू असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मनोज कोटक यांच्या प्रचारार्थराज्य आणि देशपातळीवरील दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री पुरूषोत्तमरुपाला यांच्या जाहीर सभा ईशान्य मुंबईत होत असून शुक्रवारी वांद्रे - कुर्ला संकुलात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडणार आहे.

मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीतर्फे दिग्गजांच्या सभांचेआयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर जंक्शन येथे सायंकाळी साडेसहा वाजतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. तर त्याच दिवशी रात्रौ साडेआठ वाजता टीळक रोडनाक्यावर केंद्रीय राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना ईशान्य मुंबईतील महायुतीचे सर्व आमदार,नगरसेवक आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिवाय शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतीलमहायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ वांद्रे - कुर्ला संकूलात विराट जाहीर सभा होणार आहे. या सभांमध्ये पंतप्रधानांसह मुख्यमंत्री विरोधकांचाकसा समाचार घेणार याबाबत मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.