मनोज कोटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत सहभाग नोंदवला


मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मतदार संघातील विविध ठिकाणी भेटी देऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला.

मुंबईत चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार मोर्चेबांधणी करत आहेत. मतदारांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच एखादा सण आला कि त्याठिकाणी मतदार मोठ्या संख्येने हजार असतात. अशा ठिकाणी उपस्थित राहून मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जाते. मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त अनेक शोभायात्रा निघाल्या. या शोभायात्रांमध्ये मुंबईमधील बहुतेक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांनी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या मतदार संघातील मानखुर्द, गोवंडी, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आदी विविध ठिकाणी भेटी देऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला. मतदारांचे आणि वयोवृद्धांचे आशीर्वाद घेत कोटक यांनी आपल्या खांद्यावर पालखी घेतली. तसेच ते लेझीम खेळले. यावेळी त्याच्यासोबत खासदार किरीट सोमय्या व भाजपाचे नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी मतदारसंघातील जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, सामाजिक संस्थामधील कार्यकर्त्यांच्या भेटीवर जोर दिला आहे.