मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही.- आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2019

मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही.- आनंदराज आंबेडकर


मुंबई - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या रविवार सकाळपासून चर्चेत आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे आता समोर आले. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. ही केवळ अफवा आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र या चर्चेला आनंदराज यांनी स्वत:च पूर्णविराम दिला.

गेल्या आठ दिवसांपासून मी मुंबईत आहे. दिल्लीला गेलेलो नाही. आम्ही दिल्ली प्रदेश रिपब्लिकन सेना बरखास्त केल्याचे आंबेडकर यांनी सांगतिले. दिल्लीत आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्यामुळे काँग्रेस बिथरली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त खोटे आहे. हे वृत्त पसरविणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad