मुंबई - अंधेरीतील यारी रोड परिसरात माजिल मस्जिद चौकातील सरिता या चार मजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंधेरीतील यारी रोड परिसरात माजिल मस्जिद चौकातील सरिता या चार मजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीचे लोळ उठू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासांनी आग विझवण्यात यश आले. या आगीत दिप देसाई (वय 35 वर्ष) 35 ते 40 टक्के भाजले आहेत. तर निलिमा (वय 65 वर्ष) यांच्या डोक्याला मार लागला आहे. या दोघानांही कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.