लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ६७ 'शेड' वर कारवाई


मुंबई -- एल विभातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणा-या ६७ अनधिकृत शेडवर पालिकेने धडक कारवाई केली. या कारवाई मुळे येथील पदपथ मोकळे झाले असून वाहतूकही सुरळीत होणार आहे, अशी माहिती एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली. 

'एल' विभाग क्षेत्रातील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत असणा-या पदपथावर उद्भवलेल्या ६७ 'शेड'वर मुंबई पोलीसांच्या सहकार्याने व महापालिकेच्या 'एल' विभागामार्फत मंगळवारी दिवसभर करण्यात आलेल्या धडक कारवाईत लाल बहादूर शास्त्री मार्गालगतचे पदपथ मोकळे झाले असल्याने पादचा-यांना चालण्यासाठी सोयीचे झाले आहे. कारवाईसाठी १ जेसीबी, ४ टेम्पो यासह इतर वाहने व आवश्यक ती साधनसामुग्री वापरण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Tags