पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.५३ टक्क्यांनी घट झाली आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८२.५१ टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल ९०.२५ तर मुलांचा एकूण निकाल ८२.४० टक्के लागला आहे.
विभागनिहाय निकाल -
पुणे : ८७.८८ %.
नागपूर : ८२.५१ %.
औरंगाबाद : ८७.२९ %.
मुंबई : ८३.८५ %.
कोल्हापूर : ८७.१२ %.
अमरावती : ८७.५५ %.
नाशिक : ८४.७७ %.
लातूर : ८६.०८ %.
कोकण : ९३.२३ %.