Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ड्राय रन यशस्वी मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज - शिवाजी जोंधळे


मुंबई - दि २१: मुंबई शहर जिल्हयात मतमोजणीसाठी दोन्हीही लोकसभा मतदारसंघात आज मतमोजणी यंत्रणेची तयारी संदर्भांत ड्राय रन तसेच इतर काही तांत्रिक बाबींसदर्भांतील तालीम घेण्यात आली असून मुंबई शहर जिल्हा मतमोजणीसाठी सज्ज्‍ा असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. आज पार पडलेल्या ड्राय रनमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती सुविधा ॲपवर देण्यात आली. ही माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या माहितीची उलट तपासणी करुन आढळून आलेल्या काही त्रूटींची पूर्तता करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन ड्राय रन यशस्वी केली.

झालेले मतदान -
३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातएकूणमतदार संख्या पुरुष ७,७७,७१६, स्त्री ६,६२,३३५ व इतर ९१ असेएकूण१४,४०,११० मतदार आहेत. तसेच अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, कोळीवाडा, वडाळा, माहिम हे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात पूढीलप्रमाणे मतदान झाले आहे. पुरुष-४,३२,२६०, स्त्री-३,६३,१०७ व इतर ३२ असेएकूण७,९५,३९९ म्हणजे ५५.२३% मतदान झाले आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातएकूणमतदार संख्या पुरुष ८,५४,१२१, स्त्री ६,९९,७८१ व इतर २३ असेएकूण१५,५३,९२५ मतदार आहेत. तर वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघात पूढीलप्रमाणे मतदार झाले आहे. पुरुष-४,३८,५९१, स्त्री-३,६१,०१६ व इतर ०५ असेएकूण७,९९,६१२ म्हणजे ५१.४५ % मतदान झाले.

३०-मुंबई दक्षिण मध्य मतदार लोकसभा मतदारसंघात सैन्यदलातील मतपत्रिका २३८ मतदार व टपाली मतपत्रिका ३५३७ असे एकूण ३७७५ मतदार आहेत. तसेच ३१-मुंबई दक्षिण मतदार लोकसभा मतदारसंघात सैन्यदलातील मतपत्रिका २५१ मतदार व टपाली मतपत्रिका ३१३३ असे एकूण ३३८४ मतदार आहेत.

मत मोजणीचा आराखडा -
मुंबई जिल्हयातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघातीलएकूण१२ विधानसभा मतदार संघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी विधानसभा निहाय १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार लोकसभा मतदार संघाच्या फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी ठिक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. सर्व प्रथम सैन्यदलातील कर्मचाऱ्यांची व टपाली मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल व ८:३० वाजता मशीनवर नेमलेल्या मतांची मतमोजणी फेरी निहाय केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर व त्याची विधानसभा निहाय आकडेवारी जाहीर केल्यानंतर मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे.

सर्व मतदारसंघाची टेबल व फेरी निहाय मतमोजणी, टपाली मतपत्रिका व सैन्यदलातील मतपत्रिका यांची मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल.

केंद्रिय निवडणूक निरीक्षक -
३१ मुंबई दक्षिण मतदारसंघाच्या मतमोजणी करिता केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नेमणुक झाली असुन श्री रविंद्रकुमार चौधा हे १८२-वरळी व १८३ - शिवडी या दोन विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक आहेत तर श्रीमती भारती ओग्रे या १८४ - भायखळा व १८५ - मलबार हिल या मतदारसंघाकरिता आणि श्रीमती रेणुका श्रीवास्तव १८६ - मुंबादेवी व १८७- कुलाबा या मतदारसंघाकरिता मतमोजणी निरीक्षक म्हणुन काम पाहणार आहेत.

३० मुंबई दक्षिण मध्य करिता केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्री बिश्वनाथ सिन्हा हे १८०- वडाळा व १८१- माहिम या दोन विधानसभा मतदारसंघाचे निरक्षक म्हणुन काम पाहणार आहेत. तर श्री समीर कुमार भट्टाचार्य हे १७८- धारावी व १७९ - सायन कोळीवाडा मतदारसंघ आणि श्री एस के मिश्रा १७२- अणुशक्तीनगर व १७३ - चेंबुर याकरिता मतमोजणी निरीक्षक आहेत.

मर्यादित प्रवेश -
शिवडी येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यास व उमेदवारास, मतदान प्रतिनिधी, मतगणना प्रतिनिधीस मतमोजणी केंद्रात माबाईल फोन अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास बंदी आहे.

प्रशिक्षण पूर्ण -
मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी/ कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी/ कर्मचारी यांना मंगळवार, १४ मे २०१९ रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आलेले असून शुक्रवार १७ मे २०१९ रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच मतमोजणीची रंगीत तालीम बुधवार, दिनांक २२ मे २०१९ रोजी दुपारी ३:०० वाजता शिवडी मतमोजणी केंद्र येथे घेण्यात येणार आहे.

टपाली सेवा मतपत्रिकांची व मशीनवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ मतदार केंद्राची निवड VVPAT मोजणीसाठी लॉटरी पध्दतीने करण्यात येईल. त्या मतपत्रिका चिठयांची मोजणी व मतदान केंद्राची मोजणी अनुक्रमाने पूर्ण करण्यात येईल. पाच मतदान केंद्राची VVPAT चिठ्ठी मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील.

३0- मुंबई दक्षिण-मध्य चे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार, ३१ मुंबई दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी तसेच उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी फरोग मुकादम या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर व त्यांचे सहकारी सुरक्षेबाबत कार्यरत आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पद्याकर रोकडे, ज्ञानेश्वर खुटवड, रविंद्र हजारे, बी.जी. गावंडे, बाळा वाघचौरे, डॉ. दादासाहेब दातकर, किरण पाणबुडे, स्वाती कार्ले, अंजली भोसले, सुषमा सातपुते व त्यांचे सहकारी मतमोजणीसाठी सज्ज आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom