Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगही विकला आहे का? - उदित राज


मुंबई - ईव्हीएम मशीनबाबत वारंवार शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यावर आता सर्वोच्च न्यायालय या गोंधळात सामील आहे का? तसेच निवडणूक आयोगही विकला आहे का?, असा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते डाॅ. उदित राज यांनी केला आहे.

उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात म्हणाले की, व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्या मोजल्या पाहिजेत. न्यायालयही या गोंधळात सामील आहे. निवडणूक प्रक्रियेत जर सुमारे तीन महिने सरकारी कामे धीम्या गतीने होत आहे, तर मतमोजणीला दोन-तीन दिवस लागल्यास काय हरकत आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच भाजपाला जिथे जिथे ईव्हीएम बदलावीशी वाटली तिथे बदलली असतील. यासाठी सात टप्प्यांत मतदान घेण्यात आले. तुम्ही कितीही ओरडलात तरी तुमचे कोणी ऐकणार नाही. लिहून काही होणार नाही. जर देशाला इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर काढायचे असेल, तर आंदोलन करावे लागेल. निवडणूक आयोगही विकला गेला आहे, असेही राज म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad