विखे पाटील जूनमध्ये भाजपात प्रवेश करणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

27 May 2019

विखे पाटील जूनमध्ये भाजपात प्रवेश करणार


मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा धक्का पचविण्याआधीच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ४ आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळत आहे. यात अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणे यांचा समावेश आहे. अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

१ ते ६ जूनदरम्यान हा त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल, अशी माहिती मिळत आहे. याचसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. विखे पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणे यांच्याव्यतिरिक्त आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. त्यांच्या पक्षप्रवेशदरम्यान दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post Top Ad

test