मुंबईकरांसाठी आणखी १२ एसी लोकल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2019

मुंबईकरांसाठी आणखी १२ एसी लोकल


मुंबई - पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये धावली. एसी लोकलला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून रेल्वेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वीच आणखी बारा वातानुकूलित लोकल गाड्यांच्या प्रकल्पाला पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दाखल करण्यास मंजुरी दिली. २०१९ मध्ये या लोकल टप्प्याटप्यात दाखल होणार आहे.

 प्रत्येकी सहा वातानुकूलित लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेत चाचणीनंतर येतील. यातील एक लोकल आली असून चाचणीनंतर पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येईल. तर महिनाभरात दुसरीही वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर येणार आहे. जून महिन्यात मध्य रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाल्यानंतर या लोकलची चाचणी घेण्यात येईल आणि पावसाळानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉकचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिली आहेत.

एसी लोकलचे तिकिट दर ३ जूनपासून वाढविण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. परिणामी तिकिट दर कमी करण्यात यावेत असा प्रश्न विचारला असता अग्रवाल यांनी तिकिट दर ठरविण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाचा असल्याचे स्पष्ट करीत शहरातील बस आणि टॅक्सी सेवेच्या तुलनेत कमीच असल्याचे स्पष्ट केले. तसेच गेल्या १० वर्षात लोकलच्या तिकिट दरात वाढ झाली नसल्याचे देखील सांगितले.

Post Bottom Ad