सांगलीतील दीड लाखांहून अधिक व्यक्तींचे व्यक्ती पुनर्वसन

JPN NEWS
सांगली, दि. 11 : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण104 पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार 706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार 970लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

डॉ. चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावातील 4 हजार 968 कुटुंबांतील 25हजार 375 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार 461 कुटुंबांतील36 हजार 636 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12 हजार 256कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील 605कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2 हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 28 हजार 471 लोक व 608जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 7 प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !