BEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2019

BEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस!


मुंबई - मुंबईतील ट्राफिक मधून मुंबईकरांना लवकरात लवकर प्रवास करता यावा आणि ते ही गारेगार, म्हणून ‘BEST’ने नवीन उपक्रम सुरू केलाय. बेस्टच्या ताफ्यात 5 नव्या मिनी एसी बसेस दाखल झाल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असून पालिका प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत पालिकेने BEST ला 2100 कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर अनेक अटीही पालिकेने बेस्टला घातल्या होत्या. यात बेस्टचे किमान भाडे 5 रूपये करण्याची अट BEST ने मान्य केली. पण त्याचबरोबर बेस्टच्या बसगाडयांची संख्या वाढवावी ही अट होती. यासाठी बेस्टने खाजगी बस घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज नवीन खाजगी मिनी एसी बस दाखल झाल्या आहेत. त्यानंतर लवकरच 400 बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

या बस BEST ने भाडेतत्वार घेतल्या असल्या, तरीही या बसगाड्यावर बस कंडक्टर हा बेस्ट उपक्रमाचाच असेल. बस मार्ग ठरवणं हा देखील बेस्टचाच अधिकार असेल. BEST च्या तिकिटांमार्फत येणारे उत्पन्न हे BEST कडेच जाणार आहे. डिसेम्बर अखेरपर्यंत एक हजार वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. दरम्यान, डिझेलवर धावणाऱ्या 400 मिनी बसेस 7 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यात येणार असून यासाठी सुमारे 587 कोटी 49 लाख 60 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

Post Bottom Ad