मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही - उर्मिला मातोंडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही - उर्मिला मातोंडकर

Share This

मुंबई - मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मीडियाने माझ्या पक्षप्रवेशाबाबतचे कोणतेही तथ्यहीन तर्क लढवू नये, असं स्पष्ट करत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचं प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खंडन केलं. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. उर्मिला या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असून त्या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर उर्मिला यांनी हे खंडन केलं आहे. मी माझ्या मतांवर आणि विचारधारेवर ठाम असून जनतेसाठी निरंतर काम करत राहणार आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे मीडियाने ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. ते योग्य नाही, असं उर्मिला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages