Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वीज ग्राहकांना बेस्टचा शॉक, १ एप्रिलपासून दरवाढ


मुंबई - महागाईमुळे होरपळून निघणा-या मुंबईकरांना बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. वीज निर्मिती व विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने बेस्टने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचे प्रस्ताविले आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक व ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पॅावरकडून ९०० मेगावॉट वीज खरेदी करते. मात्र वीज खरेदी ट्रान्समिशन खर्चात वाढ झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या खर्चातही वाढ झाल्याने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव एमएमआरसीकडे मान्यतेसाठी सादर केल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिका-याने सांगतिले. दरम्यान, एमएमआरसीने वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून वीज दरवाढ केली जाणार आहे. बेस्ट उपक्रमाने २ ते ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव एमएमआरसीकडे सादर केला असला, तरी किती दरवाढ द्यायची याचा निर्णय एमएमआरसीच घेणार असल्याचेही अधिका-याने सांगितले. दरम्यान, सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणारा विद्युत विभाग अशी बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मुंबई शहरात पुरवठा करणा-या बेस्ट विद्युत विभागाची वीज अन्य वीजपुरवठा करणा-या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिका-याने केला आहे.

अशी असेल दरवाढ --
० ते १०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
२ रुपये ९३ पैसे - ३ रुपये ८ पैसे
---
१०१ ते ३०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
५ रुये १८ पैसे - ५ रुपये ४४ पैसे
-----
३०१ ते ५०० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
७ रुपये ७९ पैसे - ८ रुपये १८ पैसे
----
५०१ते १००० युनिट
सध्याचे दर - वाढीव दर
९ रुपये २ पैसे - ९ रुपये ६६ पैसे

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom