वित्तीय वर्षात विकासदर १० % राहण्याचा अंदाज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2020

वित्तीय वर्षात विकासदर १० % राहण्याचा अंदाज


नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकास दर १० % असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी आर्थिक वर्षात सरकारचे एकूण उत्पन्न २२.४६ लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च ३०.४२ लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्ष २०१९-२० साठी सुधारित अंदाजे खर्च २६.९९ लाख कोटी रुपये आणि उत्पन्न १९.३२ लाख कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये उधारीचा आकडा ५.३६ लाख कोटी

आर्थिक वर्ष २०१९-२०२ मध्ये सरकारची निव्वळ बाजार उधारी ४.९९ लाख कोटी असेल. पुढील आर्थिक वर्षात ती वाढून ५.३६ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. कर संकलनात वाढ होण्यास वेळ लागणार असल्याचेही सीतारामन म्हणाल्या. नुकत्याच झालेल्या कॉर्पोरेट कर कपातीमुळे कर संकलन कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पण त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.

तुटीचे लक्ष्य ३.५ टक्के

आर्थिक वर्ष २०२१ साठी वित्तीय तुटीचे लक्ष्य ३.५ टक्के ठेवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट जीडीपीच्या ३.८ टक्के इतकी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एनबीएफसी आणि एचएफसींना विशेष दिलासा

सरकारकडून मिळणारी सवलत आणि सूट सोडून देणाऱ्या आयकरदात्यांना कराच्या दरांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे, असे सीतारामन म्हणाल्या. एनबीएफसी आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडे असलेल्या निधीच्या कमतरतेची समस्या सोडविण्यासाठी सरकार कर्ज हमी योजना सुरू करेल, असेही सीतारामन म्हणाल्या.

एमएसएमईला कर्ज देण्याचे नियम असतील सोपे

बिलांच्या आधारे लघु व मध्यम युनिट्सना (एमएसएमई) कर्ज देण्यासाठी एनबीएफसीद्वारे नियम व कायद्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतरिम अहवालातील शिफारशी सरकारने मान्य केल्या असून अंतिम अहवाल नंतर दाखल केला जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

मध्यमवर्गाच्या हाती पैसा ठेवायचा आहे - 
केंद्र सरकारला लोकांच्या विशेषत: मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या हाती पैसा ठेवायचा आहे. आम्हाला आयकर प्रक्रिया सोपी करायची आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. आपल्या कारकिर्दीतील सर्वात प्रदीर्घ भाषण सीतारामन यांनी केलं. मात्र, अर्थसंकल्पाचं वाचन करत असताना मध्येच सीतारामन यांची तब्येत बिघडली. हे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांना बसण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अर्थसंकल्पाचा समारोप त्यांनी केला नाही.

आयकर प्रणालीबाबत आणलेल्या नव्या धोरणासंबंधी त्या म्हणाल्या, 'प्रामाणिक करदात्यांसाठी केंद्र सरकारने आणलेला नवा टॅक्सपेअर चार्टर (कररचना) हे महत्त्वाचे पाऊल आहे. यंदाच्या बजेटमधील ही सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा आहे. आम्हाला कर दर कमी करायचे आहेत आणि त्याचवेळी त्यातील जटीलता कमी करायची आहे.' 'देशांतर्गत वस्तूंची खप वाढवण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक खर्चात वाढ करायला हवी, मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महसूल घटल्याने खर्च वाढवणे तू्र्त शक्य नाही. म्हणून सरकारने वित्तीय तुटीचं उद्दिष्ट अर्ध्या टक्क्याने वाढवले आहे,' असेही त्यांनी सांगितले.

या वस्तू महागणार -
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. काही वस्तूंवर आयात करात वाढ केल्याने पुढील वर्षभरात ग्राहकांना या वस्तू खरेदी खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यात वाॅटर हीटर्स , इलेक्ट्रीक इस्त्री, टेबल फॅन, सिलींग फॅन, फर्निचर महागणार आहेत. तर क्रीडा साहित्य , मायक्रोफोन मात्र स्वस्त होणार आहेत.

या वस्तू महागणार

> बटर घी, बटर ऑइल , खाद्य तेल, पीनट बटर

> वेह, मेसलीन, शीतगृहातील बटाटे , आक्रोड

>च्युईंग गम , डायटरी सोया फायबर , सोया प्रोटीन

>चप्पल, शेवर्स, हेअर क्लिप, हेअर रिमुव्हींग वस्तू

> टेबलवेअर, किचनवेअर, वाॅटर फिल्टर, ग्लासवेअर

> टेबल फॅन, सिलींग फॅन, पोर्टेबल ब्लोवर्स

> वाॅटर हीटर्स, हेअर डायर्स, इलेक्ट्रीक इस्त्री

> कॉफी आणि टी-मेकर्स ,

> खेळणी स्टेशनरी, कृत्रिम फुले, बेल, ट्रॉफीज

> सिगारेट, हुक्का , जर्दा तंबाखू


या वस्तू होणार स्वस्त

> वृत्तपत्रांचा कागद (न्यूजप्रिंट)

>क्रीडा साहित्य

>मायक्रोफोन

>ई-वाहने

Post Bottom Ad