Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत कोरोनाचा तिसरा मृत्यू


मुंबई - मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे काल 23 मार्च रोजी कस्तुरबा रुणालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती युएई येथून प्रवास करुन 15 मार्चला अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ही व्यक्ती मुंबईत आली होती. या व्यक्तीला उच्चरक्तदाब तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्याने त्यांची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मुंबईतील 12 जणांची दुसरी चाचणी निगेटिव्ह
दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय दाखल केलेल्या 12 रुग्णांची दुसरी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 38
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा – 19
नागपूर – 4
यवतमाळ – 4
नवी मुंबई – 5
कल्याण – 4
सांगली- 4
अहमदनगर – 2
रायगड – 1
ठाणे – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार- 1
सातारा- 2

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom