कोरोना - मुंबईत 10 तर पुण्यात 1 असे 11 नवीन रुग्ण, राज्यात एकूण 63 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2020

कोरोना - मुंबईत 10 तर पुण्यात 1 असे 11 नवीन रुग्ण, राज्यात एकूण 63 रुग्ण


मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील शुक्रवारी कोरोना रुग्णांचा ५२ असलेला आकडा आज शनिवारी थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिक चाचणी केंद्र उभारण्यासाठी परवानगी देणार असल्याचं सांगितलं.” “मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे . त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल,” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या 2 प्रकृती गंभीर आहे. राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल.त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण -
पिंपरी चिंचवड – 12
पुणे – 10
मुंबई – 21
नागपूर – 4
यवतमाळ – 3
कल्याण – 3
नवी मुंबई – 3
रायगड – 1
ठाणे -1
अहमदनगर – 2
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर – 1
एकूण 63

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (1) – 21 मार्च
मुंबई (10) – 21 मार्च
एकूण – 63 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू -
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Post Bottom Ad