महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 January 2021

महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यातमुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी फोन वरून देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौरांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या २० वर्षीय मनोज दोढीया या युवकाला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगर येथून अटक केली असून त्याला उद्या मुंबईला आणले जाणार आहे.

२२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांना एक फोन आला. एका अज्ञात व्यक्तीने महापौरांना फोन वर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवर बोलणारा हिंदी भाषेत बोलत होता. फोनवरून मुंबईच्या महापौरांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आहे. या धमकीच्या फोन नंतर दोन दिवसांनी महापौरांनी महापालिका मुख्यालयाला लागून असलेल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर २६१/२०२० नोंदवला होता. मुंबई पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून मनोज दोढीयाचा शोध घेतला असून त्याला गुजरातच्या जाम नगर येथून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे पथक उद्या त्याला मुंबईत घेऊन येणार आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मनोज दोढीया या २० वर्षांचा युवकाने हे कृत्य का केलं याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.

Post Top Ad

test