
धारावीत दिवसभरात १० नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या ३८९० झाली आहे. यातील आतापर्यंत ३५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत १९ सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात १२ नवीन रुग्ण सापडले. येथील रुग्णांची संख्या ४८८६ झाली आहे. मात्र यातील ४६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे १०३ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०९ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४७११ वर पोहचली आहे. मात्र यातील ४४४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण १२४ आहेत.