मुंबईत ५३० नवीन रुग्ण, ७ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१७ जानेवारी २०२१

मुंबईत ५३० नवीन रुग्ण, ७ रुग्णांचा मृत्यू



मुंबई - मुंबईत २४ तासांत ५३० नवीन रुग्ण आढळले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ३०२७५३ झाली असून एकूण मृतांचा आकडा ११२४२ वर पोहचला आहे. दरम्यान रविवारी दिवसभरात ७१५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २८३८५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या ६७७२ अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

धारावीत दिवसभरात १० नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या ३८९० झाली आहे. यातील आतापर्यंत ३५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत १९ सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात १२ नवीन रुग्ण सापडले. येथील रुग्णांची संख्या ४८८६ झाली आहे. मात्र यातील ४६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे १०३ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०९ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४७११ वर पोहचली आहे. मात्र यातील ४४४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण १२४ आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS