कोरोनाचा नियम मोडणा-या महिलेवर गुन्हा दाखल

0

मुंबई - पवई येथील एव्हरेस्ट हाईट्स सोसायटीत कोरोना रुग्ण आढळल्याने या सोसायटीतील १७ वा मजला सील करण्यात आला होता. मात्र मजला सील केल्यानंतरही येथे राहणा-या महिलेने कोरोनाचा नियम धाब्यावर बसवल्याने संबंधित महिले विरोधात पालिकेने गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी कडक कारवाईचे व थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पवई येथील एव्हरेस्ट हाईट्स या इमारतीमधील १७ व्या मजल्यावरील एक रहिवाशी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्याने पालिकेने हा मजला सील केला आहे. सील मजल्यावरील रहिवाशांना बाहेर जाण्यास पालिकेने मनाई केली. मात्र कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्या आता पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)