पालिकेचे मेगा बजेट स्थायी समितीत मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2021

पालिकेचे मेगा बजेट स्थायी समितीत मंजूर



मुंबई - आगामी पालिका निवडणूक आणि काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प 650 काेटी रुपयांच्या फेरफारीसह आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. गटनेत्यांच्या बैठकीत अर्थसंकल्पात फेरफार करून पालिका आयुक्तांनी 900 काेटी रुपये विकास कामांसाठी देवू केले हाेते. मात्र भाजपाचे नाव न घेता विराेधी पक्षांच्या आडमुठे भुमिकेमुळे देवू केलेल्या रकमेत 250 काेटी रुपयांची प्रशासनाने कपात केल्याचा ठपका स्थायी समितीचे अध्य्रक्ष यशवंत जाधव यांनी ठेवला.

गेल्या 3 फेब्रूवारी पालिकेचे 2021-22 या वर्षीचे आतापर्यंतचे ३९०३८.८३ कोटी रुपयांचे सर्वात मेगा बजेट पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केले हाेते..यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न २७८११.५७ आणि महसुली खर्च २०२७६.३३ इतका आहे. तर भांडवली उत्पन्न ६६२.९६ कोटी आणि भांडवली खर्च १४१११.०५ इतका आहे. कोरोनामुळे यंदाच्या महसूलाला ४०० कोटीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ११.५१ कोटी शिलकीचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७९७.९१ कोटी रुपये वाढ असलेल्या या अर्थसंकल्पात विकास प्रकल्प, शिक्षण, आरोग्य, शहराचे सौंदर्यीकरण यासाठी भरीव तरतूद करताना कोणतीही करवाढ न करता मुंबईकरांना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खूष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणूक संकल्पच ठरला आहे. स्थायी समितीत या अर्थसंकल्पावर तब्बल चार दिवस चर्चा झाली. स्थायी समितीच्या 26 पैकी 23 सदस्यांची अर्थसंकल्पावर भाषणे झाली. भांडवली आणि महसूली अर्थसंकल्पात बदल सुचवून विकास कामांसाठी 650 काेटी रुपयांची तरतूद स्थायी समितीत प्रशासनाने केली आणि त्यास मान्यता दिली. सर्व पक्षीय नगरसेवकांच्या संमतीने ही तरतूद करण्यात आली आहे. त्या 650 काेटी रुपयांच्या तरतूदीला समिती सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

आता मिळणार सभागृहाची मंजूरी
अर्थसंकल्पात प्रशासनाने केलेल्या या फेरफारीने अर्थसंकल्प संतूलित झाला असून प्रशासनाने अर्थसंकल्पात सूचविलेली कामे नियाेजित वेळेत पूर्ण केली जातील. त्यात काेणत्याली प्रकारची अडचण येणार नाही, तसेच जी कामे अपूर्ण आहेत ती सुध्दा तातडीने पूर्ण केली जातील, ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव यांनी दिली. यी समितीेन मंजूर केलेला हा अर्थसंकल्प आता पालिका सभागृहात मंजूरीसाठी सादर हाेणार आहे. सभागृहाची मंजूरी मिळाल्यास अर्थसंकल्पाची अंमलबजावणी हाेईल माहिती पालिका प्रशासनाने दिली.

भाजपावर ठपका
गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाने देवू केलेला विकास कामांचा साठीचा 900 काेटी रुपयांचा विकास निधी भाजपचे नाव न घेता विराेधी पक्षामुळे कमी झाल्याचा ठपका स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव यांनी ठेवला. विकास कामे करताना सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी सहयाेगी आणि सामंजस्याने राहिले पाहिजे असे मत असा सल्लाही त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad