मुंबईत ८४७९ नवीन रुग्ण - ५३ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 April 2021

मुंबईत ८४७९ नवीन रुग्ण - ५३ रुग्णांचा मृत्यूमुंबई - मुंबईत रविवारी दिवसभऱात ८४७९ नवीन रुग्ण आढळले असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ११ हजारावर पोहचलेली रुग्णसंख्या पाच - सहा दिवसांपासून साडेआठ ते साडेनऊ हजारापर्यंत स्थिर राहिली आहे. दिवसभरात ८०७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ५७९३११ वर पोहचली आहे. तर ४७८०३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १२३४७ रुग्ण मृत्यू झाले आहेत. सध्या एकूण ८७६९८ सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के आहे. ११ ते १७ एप्रिलपर्यंत कोविड वाढीचा दर १.५३ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५ दिवसांवर आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.


Post Top Ad

test