७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय सर्वांसाठी लोकल नाही

Anonymous
0


मुंबई - शहर आणि उपनगरात ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय सर्वांसाठी लोकल सुरू करता येणार नाहीत. तसेच शहरातील इतर निर्बंध सुद्धा हटवता येणार नाहीत, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत लसीकरण ६० ते ७० टक्के होत नाही, तोपर्यंत सर्व खुलं करणं योग्य ठरणार नाही. जशी-जशी सूट देता येईल ते आम्ही देतचं असतो. तसेच आम्ही जे पाऊलं उचलतोय ते योग्य उचलतोय, असे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले आहे, असे शेख म्हणाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं तूर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. मात्र, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)