शुक्रवार २३ जुलैपासून मुंबईतील लसीकरण पुन्हा सुरू होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2021

शुक्रवार २३ जुलैपासून मुंबईतील लसीकरण पुन्हा सुरू होणार


मुंबई - लशीच्या तुटवड्यामुळे बुधवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होते. लशींचा साठा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरु आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत लशींचा साठा उपलब्ध होणार असून गुरुवारी सर्व केंद्राना वितरित केला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, २३ जुलैपासून लसीकरणाला सुरुवात होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
शुक्रवारी मुंबईतील शासकीय व पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्डचे ५० हजार तर कोवॅक्सिनचे ११ हजार २०० असे एकूण ६१ हजार २०० डोस उपलब्ध होणार आहेत. बुधवारी रात्री उशिराने लस मुंबईत दाखल होणार असून गुरुवारी दिवसभर लसीकरण केंद्रावर वितरित केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारीही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad