Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

विधान परिषद - मुंबई महापालिका मतदारसंघातून भाजपतर्फे राजहंस सिंग यांना उमेदवारीमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर (Maharashtra Legislative Council Election) सदस्य निवडून दिले जातात. मुंबई महापालिकेतून (Bmc) (mumbai municipal corporation) विधान परिषदेवर २ सदस्य निवडून दिले जातात. सत्ताधारी शिवसेनेकडून वरळीचे माजी आमदार सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून (Bjp) पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या पालिकेतील नगरसेवकांकडून सिंग यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

उत्तर भारतीय चेहरा -
राजहंस सिंग हे सर्वप्रथम 1992 मध्ये मुंबई पालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. 1992 ते 1997 ते नगरसेवक होते.
नंतर दोन वर्ष 2002 पासून 2012 पर्यंत सलग बारा वर्षे नगरसेवक होते. या कालावधीत 2004 पासून 2012 पर्यंत सलग आठ वर्ष ते विरोधी पक्ष नेता पदी होते. याच दरम्यान वर्ष 2009 मध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेत. 2009 ते 2014 ते विधानसभा सदस्य ही होते. वर्ष 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आज पर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

पंधरा वर्ष नगरसेवक -
मुंबई भारतीय जनता पक्ष आयोजित मुंबईतील चौपाल कार्यक्रमात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे. रूबाबदार व्यक्तिमत्व, मराठी भाषेवरिल प्रभुत्व आणि जोरकस भाषण शैली अत्यंत कुशाग्र बुद्धी प्रामाणिक आणि संनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पालिकेच्या इतिहासात या मतदार संघातून निवडून जाणाऱ्या उमेदवारांपैकी राजहंस सिंग हे मुंबई महापालिकेत तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले असे पहिलेच उमेदवार असावेत. म्हणूनच मुंबई भाजपच्या नगरसेवक गटातर्फे त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करीत त्यांचे जुने सहकारी आणि आत्ताचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom