भाजलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये दिरंगाई प्रकरणी चौकशीचे आदेश

Anonymous
0


मुंबई - वरळीतील कामगार वसाहतीमध्ये मंगळवारी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून त्यात भाजलेल्या चार जणांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करणारी एक चित्रफित सोशल मीडियावर दाखल झाल्यानंतर पालिकेने याची दखल घेतली आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशीत दोषी आढळणा-यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिन्य़ाच्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलासह चौघे जण भाजले आहेत. घटनास्थळी महानगरपालिका अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयात संबंधीत रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचे आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)