
मुंबई - मुंबईत मंगळवारी १८७ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्य़ांना घरी सोडण्यात आले. मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटली आहे. दोनशे ते अडीचशेच्या आत रुग्मांची नोंद होते आहे. मृतांचे प्रमाणही कमी झाल्याने कोरोनास्थिती सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ६२ हजार ८८१ वर गेली आहे. तर ७ लाख ४१ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १६३३६ झाला आहे. सद्यस्थितीत २०५२ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांत २९२२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २७८२ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली
No comments:
Post a Comment