स्वयंपाकाला उशीर केल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले

0


हिंगोली - स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने पतीने पत्नीचे हातपाय बांधून जाळल्याचा प्रकार समोर आला ( Wife Burn Alive In Hingoli ) आहे. हिंगोली सेनगाव तालुक्यातील सवना येथे हा प्रकार घडला असून 78 वर्षीय महिलेला तिच्या पतीने रॉकेल टाकून जिवंत जाळले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुंदराबाई कुंडलिक नाईक, असे मयत महिलेचे नाव आहे. तर कुंडलिक शिवराम नाईक असे आरोपीचे नाव आहे. कुंडलिक शिवराम नाईक यांना पाच मुली असून, त्यांची लग्न झाली आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघेच घरी राहतात. कुंडलिक नाईक यांचा स्वभाव रागीट होता. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने कुंडलिक नाईक यांनी पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिले. शेजाऱ्यांनी धूर येत असल्याचे पाहून घराकडे धाव घेतली. तेव्हा, सुंदराबाई नाईक या होरपळून गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील, उप निरीक्षक बाबुराव जाधव, राहुल गोटरे, गजानन बेडगे घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिरपूर जैन येथील जरिता वाघ यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक नाईक विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)