महाराष्ट्राला स्वच्छ वाहतुकीचे केंद्र बनवणार - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2022

महाराष्ट्राला स्वच्छ वाहतुकीचे केंद्र बनवणार - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे



मुंबई - देशात महाराष्ट्राला प्रदूषणरहित अव्वल राज्य बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. इव्ही धोरणांचा अधिक चांगला उपयोग होण्यासाठी विविध उद्योगांशी चर्चेचा मार्ग आम्ही खुला केला आहे. व्यावसायिकांना आम्ही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि पूर्ण लाभ घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. (To make Maharashtra a center of clean transportation)

महाराष्ट्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय नॉन प्रॉफिट-क्लायमेट ग्रुप यांनी संयुक्तपणे एक कार्यक्रम घेतला. त्यात आघाडीच्या व्यवसायिकांना एकत्र आणत 'इव्ही १०० या कार्यक्रमाच्या अंतर्गत' इव्हीच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. या  कार्यक्रमात  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह फ्लिपकार्ट, आयकीया इंडिया आणि झोमॅटो सारख्या आघाडीच्या कंपन्यांतील सीईओ सहभागी झाले होते. इव्ही १०० या कार्यक्रमात  एँमेझॉन इंडिया, मुविंग अँड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाही सहभाग होता.

महाराष्ट्र सरकारने आगामी वर्षासाठी  महत्वाकांक्षी ईव्ही लक्ष्ये निश्चित केली आहेत. जुलै 2021 मध्ये जारी केलेले त्यांचे ईव्ही धोरण वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी मागणी आणि पुरवठा वाढविण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांसह देण्यात आले आहेत. ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसह  पॉलिसी इतर वित्तीय आणि गैर-आर्थिक प्रोत्साहनांसह सर्व नवीन ईव्हीवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कातही सूट देण्यात आली आहे. कार्यक्रमात, सरकारने कंपन्यांच्या इनपुट आणि फीडबॅकचे स्वागत केले. 
राज्याच्या इव्ही धोरणांतर्गत तरतुदी आणि प्रोत्साहनांचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेता यावा, हाही उद्देश यामागे होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यवसायिकांनी त्यांचे विद्युतीकरण लक्ष्य, कृती योजना आणि आतापर्यंत केलेली प्रगती सादर केली. त्यांनी पश्चिम राष्ट्रांच्या इव्ही  धोरणानुसार 2025 पर्यंत 25 टक्के संक्रमण घडवून आणण्यासाठी सध्याच्या मागणी प्रोत्साहनांच्या भूमिकेवर देखील चर्चा केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या वक्त्यांनी राज्य सरकारला  इव्ही  टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी मुख्य प्रवाहातील वित्ताचा लाभ घेण्यासह आणखी प्रोत्साहनांचा विचार करण्याची विनंती केली. शून्य उत्सर्जन क्षेत्र आणि 2030 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरणाची महत्त्वाकांक्षी लक्ष्ये यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, जागतिक इव्ही १०० उपक्रमात भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य बनले.
 
क्लायमेट ग्रुपच्या भारताच्या कार्यकारी संचालक दिव्या शर्मा म्हणाल्या: "ईव्ही संक्रमणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करतो. स्वच्छ वाहन भविष्याच्या उभारणीसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्यांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्ये आणि व्यवसायांचे आंतर-क्षेत्रीय योगदान महत्त्वपूर्ण ठरेल. महाराष्ट्राच्या सतत सहकार्यासाठी इव्ही 100 कंपन्यांसह धोरणात्मक आदेश राज्यभर दीर्घकालीन आणि व्यापक आर्थिक संधी उघडतील." सहभागी कंपन्या त्यांचे संक्रमण रोडमॅप प्लॅन सरकारला सादर करतील, शक्यतो 2030 पूर्वी अधिक फ्लीट इलेक्ट्रिफिकेशन साध्य करण्यासाठी सुधारित उद्दिष्टांसह. कार्यक्रमात, क्लायमेट ग्रुपने इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टला मदत करण्यासाठी भागधारकांमधील संवाद सुलभ करण्यासाठी कंपन्यांचा एक कृती गट तयार करण्याची घोषणा केली.
 
फ्लिपकार्टचे ग्रुप सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले: "आम्ही भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी आहोत ज्याने 2030 पर्यंत आमच्या शेवटच्या माईलच्या ताफ्यातील १००% इव्हीस् मध्ये परावर्तनकरिता इव्ही १०० या उपक्रमासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे. संपूर्ण देशभरात इव्ही  चा अधिकाधिक अवलंब करण्याचा मार्ग मोकळा करत असताना, व्यवसाय आणि शाश्वतता दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रासंगिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आम्ही आमच्या व्यवसायिक जबाबदारीसह व्यवहारिक उपाययोजनां करिता राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा करतो.  

झोमॅटोचे सह-संस्थापक आणि न्यू बिझनेसचे प्रमुख मोहित गुप्ता म्हणाले: "शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा फायदा घेण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या मात्वाकांक्षी प्रयत्नांचे झोमँटो स्वागत करते. आम्ही इव्ही  इकोसिस्टमकडे जाण्याच्या आवश्यकतेशी सहमत आहोत. २०३० पर्यंत या महत्वाकांक्षी उद्देश पर्यंत पोहचण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. धोरणांचे प्रत्यक्ष कृतीत अंमल करण्यासाठी निर्णय घेण्याच्या या सामुहिक/सल्लागार पद्धतीचे स्वागत करतो.

सुसाने पुलंवरेर, CEO आणि CSO (चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर), IKEA India, म्हणाल्या: "आम्ही महाराष्ट्र सरकारच्या या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाचे स्वागत करतो.लोक आणि वसुंधरा कशी शाबूत आणि संतुलित राहील हे व्यावसायिक धोरणाचा अविभाज्य भाग आहे.  2025 पर्यंत भारतात आमच्या शेवटच्या ग्राहकापर्यंत वितरण करण्या करिता १०० टक्के इव्ही गाड्यांचा समावेश असेल असे आमचे धेय्य आहे. हे केवळ आमच्या मौल्यवान भागीदारांच्या सहकार्यानेच शक्य होऊ शकते."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad