शिंदे विरुद्ध शिवसेना, आता लढाई सर्वोच्च न्यायालयात

JPN NEWS
0
मुंबई - शिवसेनेत बंडखोरी करणारे  मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष यांनी नोटीस बजावली आहे. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी (27 जून रोजी) तात्काळ सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री व नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. शिवसेनेचे तसेच अपक्ष अशा सुमारे चाळीसहून अधिक आमदारांना घेऊन शिंदे यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठले आहे. विधानसभा नियमानुसार या आमदारांवर कारवाई करावी यासाठी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. या विरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेवर उद्या सोमवार रोजी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)