गद्दारांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, मुंबईत बॅनरबाजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2022

गद्दारांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, मुंबईत बॅनरबाजी


मुंबई - शिवसेनेतील एक गट फुटून बंडखोऱी केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मुंबई व परिसरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी बंडखोर गटाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बेईमानी करणाऱ्या गद्दार आमदारांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर आहेत, असा संदेश मानखुर्द परिसरात बॅनरवर झळकत आहे. तर माझगाव येथील आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघात त्यांचे लावलेले बॅनर्स फाडण्यात आले.

विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांविरोधात बॅनरबाजी केली जाते. आहे. मानखुर्दमधील प्रभाग १४० येथील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा असे बॅनर्स झळकले आहेत. तर माझगाव येथील आमदार यामिनी जाधव याच्य़ा मतदारसंघातही त्यांचे लावलेले बॅनर्स शिवसैनिकांनी फाडून टाकून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

शिवसेनेचे माहीम विधानसभेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात धारावीतील संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी सरवणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहणार असल्याचे शिवसैनिकांनी स्पष्ट केले जाते आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad