Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल



पुणे - बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी विधानसभा निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रांमध्ये शेतजमीन, वाहने, मालमत्ता आणि शिक्षणाविषयीच्या माहितीमध्ये लपवाछपवी केल्याचे आणि त्यामध्ये तफावती आढळून आल्या असल्याने एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अभिजित खेडकर, डॉ. अभिषेक हरिदास यांनी ॲड. समीर शेख यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम १९९, २०० लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे. अभिजित खेडकर, डॉ. अभिषेक हरिदास यांनी ऍड. समीर शेख यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम १९९, २०० लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे. शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुका लढवताना शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रांमध्ये तफावती आढळल्या आहेत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

शेत जमिनीचाही घोळ -
२००९ आणि २०१४ च्या शपथपत्रांमध्ये शिंदे यांनी पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले होते. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिह्यातील चिखलगाव येथे सर्वे नंबर ८४४, ८४५ ही जमीन ६ ऑगस्ट २००९ मध्येच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांनी २०१४, २०१९ च्या शपथपत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरीच्या तपशिलात उत्पन्नाच्या स्रोतामध्ये शेतकरी असल्याचे नमूद केलेले नाही, असे याचिकेत म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये आरमाडा गाडी ८ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या निवडणूक शपथपत्रामध्ये हीच आरमाडा ९६ हजार ७२० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, २०१९ च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या १ लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात बोलेरो ६ लाख ९६ हजार ३७० रुपयांना, तर तीच गाडी २०१९ च्या शपथपत्रात १ लाख ८९ हजार ७५० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. २०१४ च्या शपथपत्रक्षात एक टेम्पो ९२ हजार २२४ रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या शपथपत्रात तोच टेम्पो त्यांच्या पत्नीने २१ हजार ३६० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात इनोव्हा १७ लाख ७० हजार १५० रुपयांना खरेदी केल्याचे, तर २०१९ च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी त्यांच्या पत्नीने ६ लाख ४२ हजार २३० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

इमारत खरेदी केल्याची माहिती लपविली -
शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र,२०१९ च्या शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नीकडे ठाणे येथील वागळे इस्टेट येथे ००७ प्लॉट नंबर बी ५१ येथे वाणिज्य इमारत २० नोव्हेंबर २००२ रोजीच खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रात ही इमारत खरेदी केल्याची माहिती लपविल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये हाऊस नंबर ५, लँडमार्क को. ऑ. हौ. सो. ली. फायनल प्लॉट नंबर ६० इस्टर्न एक्सप्रेस ठाणे ही निवासी इमारत १ कोटी ६ लाख २७ हजार ८१५ रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर, तीच इमारत २०१९ च्या शपथपत्रामध्ये १ कोटी ६ लाख २७ हजार ४९५ रुपयांना खरेदी केल्याचे नमूद आहे.

शिक्षण ११ वी पास ; पण शाळा वेगवेगळ्या -
एकनाथ शिंदे ११ वी उत्तीर्ण आहेत. मात्र, त्यातही शाळांची लपवाछपवी करण्यात आली आहे. २००९ च्या शपथपत्रामध्ये त्यांनी ठाण्यातील मंगला हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज येथून १९८१ साली ११ वी उत्तीर्ण झाल्याचे नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom