मीरा भाईंदर मधील बंडखोर गटातील काही नगरसेवक मातोश्रीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2022

मीरा भाईंदर मधील बंडखोर गटातील काही नगरसेवक मातोश्रीवर


मीरा भाईंदर - मीरा भाईंदर मधील अनेक शिवसेना नगरसेवक-प्रमुख पदाधिकारी आदींनी थेट मातोश्रीवर उपस्थिती दर्शवत आपण शिवसेने सोबतच असल्याचे वचन पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. विशेष म्हणजे बंडखोर गटाच्या बैठकीला उपस्थित काही नगरसेवक देखील मातोश्रीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर मीरा भाईंदर मधील शिवसेना नगरसेवक - शिवसैनिक यांना आपल्याकडे ओढण्याच्या जोरदार हालचाली आहे. सरनाईक हे कॉल करून तर पूर्वेश सरनाईक, स्वीकृत सदस्य विक्रम प्रताप सिंह आदीं प्रत्यक्ष भेटून करत आहेत.

पालिकेत सेनेचे सध्या २१ नगरसेवक असून त्यातील २ नगरसेविका आधीच भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे १९ नगरसेवक व शिवसैनिकांना फोडण्याचा बंडखोर गटाचा प्रयत्न आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवक, प्रमुख शिवसैनिक व माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवली होती. तर आ. सरनाईकांच्या कार्यालयात पूर्वेश यांनी बोलावलेल्या बैठकीत राजू भोईर,अनंत शिर्के व संध्या पाटील हे तिघेच नगरसेवक उपस्थित होते.

बंडखोरांच्या बैठकीला गेलेले राजू भोईर, अनंत शिर्के यांनी मातोश्री वर देखिल उपस्थिती दर्शवली. याशिवाय प्रवीण पाटील, नीलम ढवण, भावना भोईर, शर्मिला बगाजी, अर्चना कदम, स्नेहा पांडे, दिनेश नलावडे, हेलन गोविंद आदी नगरसेवकांसह प्रभाकर म्हात्रे, लक्ष्मण जंगम, शैलेश पांडे , संतोष गुप्ता आदी प्रमुख पदाधिकारी सुद्धा मातोश्रीवर हजर होते.

अचानक मातोश्रीवर जाणे ठरल्याने सेनेच्या बैठकीला हजर असलेल्या अन्य नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आदींना मात्र जाता आले नाही असे असे ढवण यांनी म्हटले आहे. यावेळी मातोश्री मध्ये तसेच तेजस ठाकरे यांच्यासोबत आवर्जून फोटो काढून घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad