Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आघाडीने बदललेल्या "या" नियमामुळे भाजपचा फायदा


मुंबई - विधानसभा (vidhansabha)  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विजय झाला आणि ते अध्यक्ष झाले. परंतु महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी ज्या नियमात बदल केला, त्याचाच फायदा भाजपला झाला. कारण भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यामुळे नियम महाविकास आघाडीने बदलला आणि फायदा भाजपला झाला, असे चित्र आज पाहायला मिळाले.

खुल्या पद्धतीने मतदान होऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेळलेल्या एका खेळीची आठवण झाली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने न होता खुल्या पद्धतीने व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने आग्रह धरत नियमात बदल केले आणि त्याचा फायदा आज भाजपला झाला. खरे तर महाविकास आघाडीचा उमेदवार विधानसभा अध्यक्ष व्हावा, म्हणून खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी नियम बदलले. परंतु हेच नियम आता भाजप आणि शिंदे गटासाठी फायदेशीर ठरले आहेत. अर्थात या प्रकरणात दोन्ही बाजूने व्हीप बजावण्यात आले आहेत. त्यामुळे ही लढाई कोर्टातही सुरू राहील. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त मते मिळाली. आता विधिमंडळात अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणीदेखील पार पडणार आहे.

पावसाळी अधिवेशनात दिली होती मंजुरी - 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात याच गुप्त मतदान पद्धतीमुळे मतांची फाटाफूट होऊ नये, याकरिता विधानसभा नियम ६ मध्ये सुधारणा करण्याकरिता पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल दिल्यानंतर विधानसभा नियम समितीने अहवालावर चर्चा करुन हा अहवाल मे २०२१ मध्ये मंजूर केला. त्याला सभागृहाने मागच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी दिली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom