
मुंबई - बंडखोरीनंतर सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पार पडलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्तेत आलेले हे सरकार ईडीचे सरकार असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरणही दिले होते. त्यात ते म्हणाले होते की, होय राज्यात ईडीचे सरकार आहे. त्याबाबत अधिक स्पष्टता देत ते म्हणाले होते की, ई म्हणजे एकनाथ तर डी म्हणजे देवेंद्र असे आहे.
देशभरातील अनेक प्रकरणांमध्ये ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्यात काही मंत्री तुरुंगातदेखील आहेत. त्यातच आता मंत्रालयातील सहव्या मजल्यावर ईडी असे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडीचं कार्यालय आहे अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ई आणि डी असे अक्षरे असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. आधी मंत्रालयात आकडेवारीनुसार बोर्ड लावलेले असायचे मात्र, आता पहिल्यांदाच नावाचे पहिले अक्षराचे बोर्ड लावण्यात आले आहे. त्यात एकनाथ शिंदेंंसाठी ई तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डी अशी अक्षरे असलेले बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ईडी सरकार आणि मंत्रालयात ईडी कार्यालय अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.