Covid 19 - कोरोना पुन्हा पसरणार, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Covid 19 - कोरोना पुन्हा पसरणार, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला

Share This


मुंबई - राज्यात कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या आठ ते दहा दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आगामी दिवाळी आणि इतर सणांचा हंगाम लक्षात घेता कोरोना प्रसारासाठी हा एक गंभीर कालावधी आहे. मोठ्या मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, सणांमध्ये कोविड-नियमांकडे होणारे दुर्लक्ष, कार्यक्रम, जत्रा, बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या जागांवर होणारी गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी -
- सणासुदीच्या काळात कोविड नियमांचे पालन करा
- कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्यास ते त्वरित करून घ्यावे. रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. यासाठी ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा.
- बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते. यासाठी घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- लक्षणे असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळावा
- वारंवार हात धुणे
- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपर वापरावा
- संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे
- कोरोना लक्षणे दिसू लागताच चाचणी करून घ्यावी. संक्रमणाची साखळी तोडता यावी म्हणून रिपोर्ट येई पर्यंत स्वत: ला इतरांपासून वेगळे करावे. कोरोनाची लागण झाल्याचे लवकर माहिती झाल्यास वेळेवर उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन करता येईल.
- ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे अशा लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages