Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

हिमनदी वितळल्यामुळे कोरोनापेक्षा भयंकर महामारी येण्याची शक्यता


लंडन - कोरोना विषाणूच्या व्हेरियंटमध्ये जगभरात महामारी पसरली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा जीव गेला, अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेकजण अनाथ झाले. कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही, अशातच वैज्ञानिकांनी आणखी एका महामारीचा इशारा दिला आहे. हिमनदी वितळल्यामुळे जगात पुन्हा एका महामारीचा सामना करावा लागू शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. (Possibility of an epidemic worse than corona due to the melting of glaciers.)

हिमनदीच्या खाली अनेक प्राचीन बॅक्टेरिया आणि विषाणू आहेत, जे बाहेर आल्यानंतर जगभरात मोठी महामारी येऊ शकते. हिमनदीच्या खाली असलेल्या विषाणूमुळे सर्वात आधी जलचर प्राणी संक्रमीत होतील. त्यानंतर अन्य जीव आणि माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे हिमनद्या वितळत आहे. या हिमनदीच्या खाली हजारो वर्षांपासून बॅक्टेरिया आणि विषाणू दडलेले आहेत. हे विषाणू तेथेच प्रजनन करत पिढ्या वाढवत आहेत. एका नव्या अभ्यासात खुलासा झालाय की, आर्क्टिक महासागराच्या हिमनदीमध्ये धोकादायक महामारी पसरवू शकणारे बॅक्टेरिया आणि विषाणूच्या प्रजननाचे केंद्र आहे. येथून निघणाऱ्या विषाणूमुळे इबोला आणि इन्फ्लूएंझा यापेक्षा भयानक महामारी पसरेल.

आर्क्टिक महासागराच्या उत्तरेला असणाऱ्या हेजन लेकवर शास्त्रज्ञांनी नुकताच अभ्यास केला. तेथील माती, गाळ आणि सेडिमेंट्सचा शास्त्रज्ञांनी तपास केला. डीएनए आणि आरएनए मिळवत त्याचा क्रम लावला. जेणेकरुन विषाणू आणि बॅक्टेरियाची माहिती मिळेल. कॉम्प्युटर अल्गोरिदमच्या मदतीनं हे विषाणू कोणत्या जनावरांचे आहेत? कोणत्या झाडाचे आहेत? कोणते बुरशीजन्य आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शास्त्रज्ञांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यानुसार, लीकमधील विषाणूचा धोका जास्त आहे. हे विषाणू जलचर प्राण्याच्या माध्यमातून मानवामध्ये संक्रमण वाढवू शकतात.

प्रासिडिंग्स ऑफ दी रॉयल सोसायटी ब यामध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, हिमनदीच्या वितळल्यानंतर या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. तापमान वाढ आणि हमामान बदलामुळे हा धोका निर्माण झाला आहे. जलवायु परिवर्तनामुळे वेगवेगळ्या जीव जंतूमध्ये व्हायरल वेक्टर बदलत आहेत. त्यामुळेच आर्क्टिकच्या अनेक भागात नव्या महामारीचं केंद्र तयार होऊस शकतं. वैज्ञानिकांनी विषाणू आणि विषाणूचा जन्म आणि त्याचा विकास याबाबत अभ्यास केला. त्यावेळी अभ्यासातून महामारी पसरण्याचा धोका वाढू शकतो, असे समोर आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom