Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रिती सातम "सिंघम" बनतात- आशीष शेलारमुंबई - आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रिती सातम या "प्रिती सिंघम" बनतात. त्यामुळेच या प्रभागात त्यांनी कामाचा डोंगर उभा केला आहे. भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी कसा असतो याचे आदर्श उदहारण प्रिती सातम यांच्या रूपाने तुमच्या समोर आहे. आगामी निवडणुकीत जनतेने साथ दिलीत तर प्रिती सातम यांच्या सारखे 150 नगरसेवक मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही देऊ अशी भावना भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक ५२ मधील भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांच्या कार्य अहवालाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, आमदार अतुल भातखळकर हे उपस्थिती होते. यावेळी शेलार बोलत होते. यावेळी बोलताना 25 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईकर नागरिकांना प्राथमिक सुविधांपासून वंचित ठेवले शिवसेनेच्या भोंगळ कारभारामुळे मुंबई कर जनतेला त्रास सहन करावा लागतोय या वेळी बदल निश्चित होणार आहे तुम्ही 2023 साली सुद्धा प्रिती सातम यांना साथ द्याल असा विश्वास व्यक्त करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी राम नाईक यांनी प्रिती सातम यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच अहवालाची एकूण रचना व गेल्या 5 वर्षांत केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले. तसेच आपला कार्य अहवाल लोकांसमोर ठेवण्याची परंपरा रामभाऊ म्हाळगी यांनी सुरू केली, मी सुद्धा ती पाळली व आता आमचे नगरसेवक सुद्धा ती पाळत आहेत. प्रीती सातम या किती कार्यक्षम आहेत ते या अहवालातुन प्रतीत होत आहे असे नाईक म्हणाले. आमदार अतुल भातखळकर यांनी प्रिती सातम यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच महापालिकेत सत्ताधारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टीकेची झोड उठविली. भाजपाचा लोकप्रतिनिधी किती जागरूक आणि लोकांच्या प्रति बांधिल असतो याचे उदाहरण प्रिती सातम आहे आणि आज येथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या गर्दीवरुन हे सिद्ध होते असे भातखळकर म्हणाले.

या प्रसंगी प्रास्ताविक करताना प्रिती सातम यांनी आपल्या 5 वर्षाच्या कामाचा आढावा घेतला व मतदार, कार्यकर्ते व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, विधानसभा अध्यक्ष अनंत परब व मान्यवर उपस्थित होते. जवळपास दीड हजाराहून अधिक नागरिक या वेळी उपस्थित होते. प्रभागातील आदिवासी महिलांनी आरेच्या जंगलातील ताजी भाजी या प्रसंगी मान्यवरांना भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली दीक्षित यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom