आफताबला फाशी द्या, लव जिहाद रोखा, भाजपा महिला मोर्चाची निदर्शने

0

मुंबई - श्रद्धा वालकर या महाराष्ट्राच्या मुलीची आफताब नावाच्या नराधमाने निर्घृण हत्या केली. या घटनेच्या विरोधात भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या वतीने अध्यक्ष शीतल गंभीर - देसाई यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्थानकाजवळील स्वामीनारायण चौकात भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी 'लव जिहाद रोखा' अश्या घोषणा देत आफताबला फाशी देण्याची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला.

भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर - देसाई म्हणाल्या, श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्या आफताबला फाशी दिली पाहिजे. महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निर्घुण हत्या आणि त्यानंतर तिच्या शरीराची झालेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सद्यस्थितीत ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. श्रद्धाची हत्या लव जिहादचा प्रकार आहे का? अशी शंका उपस्थित करत या सर्व बाबींची  पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर - देसाई यांनी केली.

यावेळी अमरजित मिश्रा, महामंत्री शशिबाला सपकाळ, सरिता राजपुरे, राजेश्री शिरवडकर, ज्योती धुळापे, सुनिता अतितकर, आशा मराठे, स्वप्ना म्हात्रे योजना ठोकरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)