मुंबई - मध्य रेल्वेवरील कर्नाक ब्रिज डिसमेंटलिंगसाठीच्या २७ तासांच्या (Railway Megablock) ब्लॉक दरम्यान शॅडो ब्लॉकमध्ये सुमारे ९०० तासांइतके काम करेल. शॅडो ब्लॉकचे काम नो ट्रेन झोनमध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड दरम्यान केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -भायखळा विभागात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वडाळा रोड विभागात अनेक मार्गांवर हे काम केले जाईल.
२७ तासांचा ब्लॉक १९ नोव्हेंबर रात्री ११ ते २१ नोव्हेंबर मध्यरात्री २ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद दरम्यानच्या सर्व सहा लाईन, ७ वी लाईन आणि यार्डवर परीचालीत केला जाईल.
या ब्लॉकचा पुरेपूर फायदा घेऊन, शॅडो ब्लॉक्स चालवले जातील ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे ९०० तासांची बचत करता येईल (अभियांत्रिकीचे ५०५ तास, OHE चे २३५ तास आणि S&T चे १६० तास). त्याचबरोबर सुमारे २००० कामगार शॅडो ब्लॉकमध्ये या विभागाची देखभाल करतील. सहा टॉवर वॅगन आणि अभियांत्रिकी यंत्रसामग्रीची १० वाहने वापरली जातील.
ट्रॅक नूतनीकरण २.४ किमीचे, १ किमीचे मॅन्युअल डीप स्क्रीनिंग, ३०० स्लीपर बदलणे आणि इतर कामे जसे की प्लेन ट्रॅक टँपिंग, टर्नआउट टँपिंग, स्विच रिप्लेसमेंट, टर्नआउट्स आणि ट्रॅकचे मॅन्युअल लिफ्टिंग, सिग्नल, लोकेशन बॉक्स, ट्रॅक वायर, जंपर्स बदलणे , पॉइंट मशीन रॉडिंग आणि केबल मेगरिंग इत्यादी कामे शॅडो ब्लॉकमध्ये केली जातील. २३ बीआरएन आणि २ इएमयू चा समावेश असलेल्या मक स्पेशलद्वारे ५००० घनमीटर गाळ काढला जाईल.
ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. हे हेल्पडेस्क तिकीट तपासणी कर्मचार्यांकडून आरपीएफ च्या सहाय्याने चालवले जातील. अतिरिक्त आरक्षण / रद्दीकरण काउंटर महत्वाच्या स्थानकांवर उघडले जात आहेत आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त एटीव्हिएम सुविधा मदतनीस सेवेत असतील.
याशिवाय शॉर्ट ओरिजिनेशन/टर्मिनेशन, मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत उद्घोषणा केल्या जात आहेत. ब्लॉकची माहिती आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात एसएमएसद्वारे आणि मध्य रेल्वेच्या ट्विटर, फेसबुक, कू आणि इंस्टाग्राम सारख्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत.
मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. मध्य रेल्वेचे अधिकारी, निरीक्षक आणि अभियंते यांच्या कार्यक्षम टीमच्या देखरेखीखाली हा महत्त्वाचा ब्लॉक पार पाडण्यासाठी प्रवाशांच्या मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मध्य रेल्वेला कौतुक वाटत आहे.
No comments:
Post a Comment