महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय !

0

मुंबई - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विदर्भ महाराष्ट्रसह २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात जळगाव ते भुसावळ  दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी जळगाव स्थानकात यार्ड, रिमॉडेलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी जाणीवपूर्वक ५ व ६ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. म्हणून हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह अप व डाऊन अशा ३८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संतापजनक असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा , अशी भावना आंबेडकरी जनतेत निर्माण झाली आहे.

जगभरातून दरवर्षी जनता परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अभिवादन करायला येत असते. हे माहित असूनही रेल्वेच्या वतीने हा निर्णय घेऊन आंबेडकरी अनुयायांना त्रास देण्याचा डाव आखला आहे. केंद्र सरकारने हया निर्णयाचा पुनर्विचार करावा, आंबेडकरी अनुयायांच्या भावनांशी खेळ करू नये असे आवाहन अनेकांनी केले आहे. आंबेडकरी अनुयायी आणि इतर प्रवाशांना  जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा बिनडोक आणि द्वेषपूर्ण निर्णय आला आहे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. 

रेल्वेच्या वतीने काही गाड्या रद्द करून काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. त्यामध्ये —-
• नागपूर-पुणे: ५ डिसेंबर
• पुणे - नागपूर : ६ डिसेंबर
• नागपूर-पुणे गरीबरथ: ४ डिसेंबर
• पुणे - नागपूर गरीबरथ: ५ डिसेंबर
• पुणे-बिलासपूर: ५ डिसेंबर 
• बिलासपूर-पुणे : ६ डिसेंबर
• नागपूर-सीएसएमटी : ५ डिसेंबर
• सीएसएमटी- नागपूर: ५ डिसेंबर
• सूरत-अमरावती : ४ डिसेंबर
• अमरावती-सूरत: ५ डिसेंबर
• नागपूर-अहमदाबाद : ४ डिसेंबर • अहमदाबाद-नागपूर : ५ डिसेंबर
• कोल्हापूर-गोंदिया : ५ डिसेंबर
• गोंदिया- कोल्हापूर : ५ डिसेंबर
• नागपूर-मडगाव : ३ डिसेंबर
• मडगाव-नागपूर : ४ डिसेंबर जबलपूर-पुणे: ४ डिसेंबर
• पुणे-जबलपूर : ५ डिसेंबर
• अमरावती-सीएसएमटी : ५ डिसेंबर
• सीएसएमटी-अमरावती : ६ डिसेंबर
• सीएसएमटी-गोंदिया : ४ डिसेंबर
• गोंदिया-सीएसएमटी : ५ डिसेंबर

त्याचप्रमाणे हावडा-अहमदाबाद, पुरी-ओखा एक्स्प्रेसचा मार्ग बदलला. मेगा ब्लॉकमुळे हावडा- अहमदाबाद, पुरी-ओखा एक्स्प्रेससह काही गाड्यांच्या नियमित मार्गात बदल करण्यात आला आहे. या गाड्या भुसावळ कार्ड लाईन- खंडवा-इटारसी-रतलाम-छायापु रीमार्गे वळविण्यात आल्या आहेत तर अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस खंडवा-भुसावळ कार्ड लाईन-अकोला-पूर्णामार्गे वळविण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनाचे गांभिर्य न जपणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)