Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईच्या माजी महापौरांना घर खाली करावे लागणार, एसआरएची नोटीस


मुंबई - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता नगर येथील गोमाता जनता एसआरए इमारतींमधील ६०१ क्रमांकाचा गाळा अवैधरित्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. हा गाळा नियमानुसार हस्तांतरित झाला नसल्याने तो गाळा नियमानुसार कारवाई करून ताब्यात घ्यावा असे पत्र एसआरएने पालिकेच्या जी साऊथ कार्यालयाला पाठवले आहे.  यामुळे किशोरी पेडणेकर यांना हा गाळा खाली करून पालिका आणि एसआरएच्या ताब्यात द्यावा लागणार आहे. (Slum Rehabilitation Authority (SRA) Sent Eviction notice to Kishori Pednekar)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या वरळी गोमाता नगर येथे राहतात. त्यांनी येथील एसआरए प्रकल्पामधील ५ ते ६ गाळे बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतल्याची तक्रार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे किश कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (kish corporate Sarvises private limited) ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून 
वरळी गोमाता जनता एसआरए  (Worli Gomata Janta SRA) मधील हे गाळे ताब्यात घेतल्याची तक्रार आहे. 

किरीट सोमय्या यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एसआरए, दादर पोलीस स्टेशन आदी ठिकाणी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दादर पोलीस ठाण्याने किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली होती. याआधी सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या मुलाला अनुभव नसताना कोविड सेंटरमधील कंत्राटे दिल्याचा आरोप केला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरए झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी चौकशी केली आहे. 

या चौकशी दरम्यान वरळी गोमाता जनता एसआरए मधील ६०१ क्रमांकाचे घर गंगाराम बोगा यांना देण्यात आले होते. नियमानुसार ते १० वर्षे हे घर हस्तांतरित करू शकत नाहीत. मात्र या घराचा पत्ता किशोरी पेडणेकर यांनी २०१७ मध्ये पालिकेची निवडणूक लढवताना दिला होता. गंगाराम बोगा यांनी नियमांचे आणि अटींचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल सहनिबंधक सहकारी संस्था झोपूप्रा यांनी सादर केला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३ (ई) अन्वये कारवाई करावी असे पत्र एसआरएने पालिकेच्या जी साऊथ विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom