मुंबई पुणे दरम्यान कारला अपघात, 5 जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पुणे दरम्यान कारला अपघात, 5 जणांचा मृत्यू

Share This

मुंबई - काल रात्री पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या इर्टीगा या कारने दुसऱ्या एका वाहनाला धडक दिली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जखमींना कामोठे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

गुरुवारी रात्री 11.30 वाजता Ertiga कार क्र  MH 14 EC 3501 पुणे ते मुंबई असा फोर्थ लेन वरून जात असताना कारवरील चालक मच्छिंद्रनाथ अंकुश चौधरी वय 39 वर्ष राहणार चिंचवड पुणे याचा कार वरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या समोर जात असलेल्या अज्ञात वाहनावर जोरात ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात कार मधील एकूण 9 प्रवास करणाऱ्या प्रवासी पैकी 5 प्रवासी हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले आहेत. त्यांना खोपोली नगर पालिका हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले आहेत. तसेच 3 प्रवाशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना लोकमान्य रुग्णवाहिकेने MGM हॉस्पिटल कामोठे पनवेल येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच कार मधील 1 प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जागेवरच उपचार करण्यात आले  आहे. अपघातातील कार रोडच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे. अपघाता ठिकाणी खोपोली पोलीस ठाण्याकडील स्टाफ हजर आहे अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages