शासकीय मुद्रणालयात भारतीय संविधानची प्रत उपलब्ध नाही

0


मुंबई - २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनानिमित्ताने राज्यामध्ये जागरूकता मोहीम राबविण्याबाबतचे शासनाने परिपत्रक काढले आहे. सर्व विभागाना संविधान दिन साजरा करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. असे असताना महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये मात्र भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. संविधान विकत घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे निराशा होत आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. तात्काळ संविधानची प्रत उपलब्ध करावी अशी मागणी केली असल्याचे संघटनेचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भारतीय संविधान दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. शासनानेही सर्व विभागाना परिपत्रक काढून संविधान दिन साजरा करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. असे असताना शासकीय मुद्रणालयात संविधान प्रतच उपलब्ध नसल्याने बांधिलकी संस्थेने संताप व्यक्त केला आहे. संविधानाची प्रत विकत घेण्यासाठी जाणा-यांचीही निराशा होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये तातडीने भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बांधिलकीचे प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे, रुपेश पुरळकर, मूलनिवासी माला, मनोज सागरे, तुषार कांबळे, आर. आर. कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)