Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक - मंगलप्रभात लोढा











मुंबई - राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. (Positive about various demands of Anganwadi staff)

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री लोढा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुशीला कोळी, संघटनेचे सहाय्यक संघटक सुधीर परमेश्वर उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत. काही महत्त्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु असून जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom