Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

व्हॉट्सऍपवर आता इंटरनेटशिवाय चॅटिंग करा


नवी दिल्ली - जगभर पसरलेल्या अब्जावधी यूजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल करणा-या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) भन्नाट बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी हटके फीचर्स आणणार असून यात वापरकर्त्याला आता इंटरनेटशिवाय या प्लॅटफॉर्मचा वापर करून चॅटिंग करता येणार आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सऍप युजर्स इंटरनेटशिवायही कनेक्टेड राहू शकणार आहे.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सऍप सेंिटग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला प्रॉक्सीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल. काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही मेसेज पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशात, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये नवीन फिचर असेल. त्याासाठी तुम्हाला व्हॉट्सऍप अपडेट करावे लागेल्जर तुमच्याकडे इंटरनेट एक्सेस असेल, तर सोशल मीडिया या सर्च इंजिनवर सुरक्षित प्रॉक्सी सोर्स शोधू शकता. पॉक्सी नेटवर्क कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज पर्यायला क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रॉक्सीया पर्यायावर क्लिक करा लागेल. युज प्रॉक्सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉक्सी नेटवर्कचा अड्रेस तिथे टाकावा लागेल. जर कनेक्शन फेल झाले तर तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर तुम्ही प्रॉक्सी कनेक्ट केल्यानंतरही मेसेज पाठवू शकत नाहीत, अथवा मिळत नाहीत तर प्रॉक्सीला ब्लॉक केलेले असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

हे फीचर देखील लाँच
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपनं नवीन फीचर आणले होते. त्यामध्ये चुकून डिलीट केलेले मेसेज अन डू ने परत आणले जाऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅक्सिडेंटल डिलीट नावाने हे फीचर आणले होते. गेल्या महिन्यात व्हॉट्सऍपने भारतात मेसेज युवर सेल्फ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. या फीचरमध्ये नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वत:चा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom