इंदू मिलप्रकरणी सरकारने राजकारण करू नये : विजय कांबळें - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2012

इंदू मिलप्रकरणी सरकारने राजकारण करू नये : विजय कांबळें


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीची मागणी सर्वप्रथम सामाजिक समता मंचाने केली होती. मात्र त्या वेळी चेष्ठा करणार्‍यांना मुख्यमंत्री आता बैठकांना बोलवून राजकारण करत असल्याचा आरोप सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी इंदू मिलच्या जमीन प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुंबईतील नेते मंडळी उपस्थित होते. मात्र स्मारकाची सर्वप्रथम मागणी करणार्‍या सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले नाही. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची मागणी मंच 1998 पासून करत आहे. मात्र नुकतेच रिपब्लिकन सेनेने हा मुद्दा उचलल्यानंतर स्मारकाची मागणी प्रकाशझोतात आली होती. महापरिनिर्वाण दिनापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्राधिकारणाची स्थापना करून स्मारकाची पायाभरणी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS